मनोज जरांगेंच्या भूमिकेपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा : चंद्रशेखर बावनकुळे

Foto
नागपूर : सध्याच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे काय करतात किंवा त्यांच्या भूमिकेपेक्षा राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये थोडा कमी पाऊस आहे. पीक करपत आहे. काल सर्व जिल्हाधिकार्‍यांची मी बैठक घेतली. आज चार वाजता पुन्हा सर्व जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते शनिवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

मुंबईमधील आंदोलन म्हणजे मुंबईकरांसाठी कायदा सुव्यवस्था संदर्भात कठीण आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहता मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलकांना विनंती राहील की, या काळात मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. ओबीसी किंवा मराठा समाज असेल कोणाचाही हक्क डावलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात कधी न घेणारे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले तरीही या दोन्ही नेत्यावर करण्यात येणारी टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला पटत नाही. आजवर मराठा समाजाला दिलेला न्याय हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला आहे. आमचा सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे. त्यामुळे सरकारला थोडं वेळ दिला गेला पाहिजे. मुंबई किंवा महाराष्ट्रात गणेश उत्सव हा देशातील सर्वात मोठा सण आहे. या काळात कोणी आंदोलन करू नये, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

दरम्यान मनोज जरांगे यांनी त्यांच्या आंदोलनाची घोषणा करण्यापूर्वी  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीला जात आहे. त्यापूर्वीच नागपूरमधील रामगिरी या बंगल्यावर फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक सुरू झाली. या बैठकीत जरांगे पाटील यांची मागणी आणि भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  कालपासून मुख्यमंत्री हे नागपूरमध्ये मुक्कामी आहेत. थोड्याच वेळात ते दिल्लीकडे रवाना होतील. त्यापूर्वीची ही भेट आणि बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या अर्धा तासापासून ही बैठक सुरू आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? 
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईत गणेशोत्सवात आंदोलन करने हे कायदा सुव्यवस्था दृष्टीने अवघड आहे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणर नाही, याची काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलनकर्त्यांना विनंती आहे, राज्याची दृष्टीने हे अयोग्य आहे.

आमची भूमिका ही एकच आहे. फडणवीस आणि शिंदे साहेबांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या दोन्ही नेत्यांवर टीकाटीप्पणी केली जाते, हे महाराष्ट्राला पटत नाही. फडणवीस, शिंदे हे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करताय. गणेशोत्सव हा देशासहित राज्यातील सर्वांत माठा सण आहे, असेही बावनकुळे यांनी पुढे सांगितले.

राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील १८ पाऊस किमी आहे, आज पुन्हा जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक होणार आहे. राज्याच्या दुष्काळाकडे लक्ष घालण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. दुष्काळासाठी काय काय उपोयजन करता येतील, त्यावर उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या. राज्याची परिस्थिती समोर आल्यावर त्यावर चर्चा होईल. त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री दौरे करणार संपूर्ण आढावा घेणार आहेत.